HW News Marathi
देश / विदेश

…म्हणून २ हजारच्या नोटांची छपाई बंद

नवी दिल्ली | केंद्राकडून २ हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याने आता २ हजारच्या नोटा चलनातून रद्द होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र केंद्राने या सर्व प्रकारच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. २ हजाराच्या नोटांची छपाई बंद होण्याचा आणि या नोटा चलनातून रद्द होण्याचा काहीही संबंध नसून बाजारात २ हजाराच्या नोटांची संख्या योग्य प्रमाणात असल्याने या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

“बाजारात २ हजाराच्या नोटांचे एकूण प्रमाण ३५ टक्के एवढे आहे. सध्या आपल्याकडे मुबलक प्रमाणात २ हजाराच्या नोटा उपलब्ध आहेत”, अशी माहिती आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिली आहे. दरम्यान, २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या विरोधी कारवाई म्हणून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. या नोटबंदीनंतर २ हजाराची नोट चलनात आणली गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या मंत्रीमंडळात बिगरभाजपचे उरले एकचं मंत्री ! रामदास आठवले …

News Desk

आज संपूर्ण भारत राममय, रोमांचित आणि भावुक झाला आहे !

News Desk

शशी थरुर यांनी दिले डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर

News Desk