HW Marathi
देश / विदेश

…मग भाजप प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करतात ? माल्ल्याचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली | “मी पंतप्रधान मोदींची मुलाखत पाहिली. त्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले कि त्यांच्या सरकारने माझ्याकडून माझ्या बँक कर्जापेक्षाही अधिकची रक्कम वसूल केली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी हे सांगितले आहे. असे आहे तर मग भाजपचे प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करत आहेत ? असा प्रश्न उपस्थित करत भारतीय बॅंकांना तब्बल ९००० कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय माल्ल्याने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विजय मल्ल्याने ट्विट करून मोदी सरकारला हा सवाल केला आहे.

“पंतप्रधान मोदी या मुलाखतीत माझे नाव घेऊन म्हणाले की, विजय माल्ल्या भारतीय बँकांचे ९००० कोटी फरार झाला असला तरी केंद्राने माल्ल्याची एकूण १४००० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी हे कबूल केले आहे कि त्यांनी माझ्याकडून अधिकची रक्कम वसूल केली आहे. मग तरीही भाजपचे प्रवक्ते माझ्याविरोधात विधाने का करत आहेत ?”, असे माल्ल्याने विचारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच दिवसांपूर्वी एका हिंदी वृत्त वहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीतील पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यांचा आधार घेत विजय माल्ल्याने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Related posts

केरळच्या विकासासाठी केंद्रसरकार भरीव मदत करणार –  रामदास आठवले

News Desk

भाजप-बीजेडी एकमेकांच्या विरोधात, मोदींनी दिले संकेत

मोदी सरकारची आता ‘नाणेबंदी’

News Desk