HW News Marathi
देश / विदेश

सूर्याच्या दिशेने झेपावले ‘सोलर प्रोब यान’, नासाची ऐतिहासिक झेप

वॉशिंग्टन । सन १९६६ मध्ये नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर प्रथमच पाउल ठेवले होते. आता ५२ वर्षाने नासाने सूर्याकडे आगेकूच केली आहे. नासाच्या वतीने आज मोठा इतिहास रचला गेला आहे. नासाने ऐतिहासिक झेप घेतली असून सोलर पार्क प्रोब यान आकाशात झेपावले आहे. रविवारी दुपारी एक वाजता नासाने आपले सोलर प्रोब यान सूर्याच्यादिशेने प्रक्षेपित केले. सूर्याच्या वातावरणात प्रथमच प्रवेश करणाऱ्या या यानाचे ‘डेल्टा -४’ असे नाव आहे. या यानाचे एकूण खर्च १. ५ बिलीयन डॉलर इतके आहे. हे यान १४९५ कोटी किलोमीटर अंतर कापणार असून यानाचा वेग ७.२४,००० एवढा आहे.

अमेरिकेच्या वेळेनुसार पहाटे ३ वाजून ३३ मिनिटांनी या यांनाच प्रक्षेपण होणार होते. मात्र प्रक्षेपणावेळी तांत्रिक अडचण आल्याने यानाच्या प्रक्षेपणाला विलंब झाल्यामुळे या यानाचे उड्डाण काल झाले नाही. आज या यानाचे उड्डाण झाले. सूर्याच्या अभ्यासासाठी नासाचे हे सर्वात मोठे मिशन आहे. नासाचे पार्कर अंतराळयान सूर्याच्या वातावरणात शिरून माहिती घेणार आहे. सूर्याची उष्णता सहन व्हावी यासाठी यानाभोवती सुरक्षा कवच आहे. हे यान २०२४ ला सूर्याच्या वातावरणात दाखल होईल. अमेरिकेच्या फ्लोरीडा शहरातील केप कॅनेव्हरल एअरफोर्स स्टेशनवरून उड्डाण होईल. डेन्व्हर शहरात शास्त्रज्ञ नियंत्रण ठेवणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

News Desk

Republic Day | तिरंग्याच्या रोषणाईने मुंबईची शोभा वाढली

News Desk

मोदी प्रेमाने जोडपे दुभंगले

News Desk