HW News Marathi
Covid-19

सौरव गांगुलींच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह 

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून अनेक क्षेत्रातील दिगज्जांपर्यंत सर्वांनाच याची झळ बसली आहे. याच पार्श्वभूमीवर, एक चिंताजनक वृत्त समोर येत आहे. बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि सौरव गांगुली यांचे मोठे बंधू स्नेहशीष गांगुली यांच्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्नेहशीष यांच्या पत्नी, सासू आणि सासरे यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे.

स्नेहशीष यांचा कोरोना रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, मोमिनपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्या कुटुंबातील सर्व सध्या उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचप्रमाणे, स्नेहशीष यांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. स्नेहशीष हे माजी रणजीपटू आहेत. त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, हे सर्वजण सौरव गांगुली यांच्या नव्हे तर दुसऱ्या घरात राहत होते. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगी आदीत्यनाथ संजय राऊतांवर का भडकले ?

News Desk

महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णालयांना २८ हजारांहून जास्त शुल्क आकारता येणार नाही !

News Desk

ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, दरेकरांचा गंभीर आरोप

News Desk