नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आज (१ जून) काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नेता निवडीची प्रक्रिया पार पडली.यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते.
Delhi: Inside visuals of Congress Parliamentary Party (CPP) meeting held earlier today. Sonia Gandhi has been elected as Chairperson of Congress Parliamentary Party. (Pic Source: AICC) pic.twitter.com/r0oVccYdlJ
— ANI (@ANI) June 1, 2019
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत देखील २०१४ प्रमाणे विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्यास, राहुल यांच्याकडे लोकसभेचे नेतेपद देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही शक्यता फेटाळली आहे. तर राहुल यांनी नेता होण्यास नकार दिल्यानंतर ज्येष्ठतेनुसार या पदासाठी मनिष तिवारी आणि शशी थरूर यांचा विचार होण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.