HW News Marathi
देश / विदेश

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आज पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार

मुंबई। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज दुसऱ्यांदा ईडी ( ED) चौकशीसाठी जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशभरात निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये मंत्रालया येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आज (२६जुलै) सत्याग्रह आंदोलन करणार आहेत.
याआधी सोनिया गांधी गुरुवारी (२१ जुलै) ईडीने चौकशी केली होती. तेव्हा सुद्धा देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी आंदोलन केले होते. यानंतर ईडीने सोनिया गांधी यांना २५ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. तेव्हा सोनिया गांधी या २५ जुलै ऐवजी २६ जुलै रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालय हजर राहतील, असे सांगण्यात आले.

नेमके काय आहे प्रकरण

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र पंडित सुरू केले होते. एकेकाळी हे काँग्रेसचे मुखपत्र मानले जात होते. परंतु, काही काळातनंतर ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र बंद पडले. यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी २०१२ मध्ये ‘यंग इंडिया’ या वर्तमानपत्राचे हक्क विकत घेतले. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून काँग्रेस जवळपासू १६०० कोटींची संपत्तीही कमी किंमतीत घेतल्याचा आरोप भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला गेला होता. या प्रकरणी २०१५ मध्ये ईडीने तपास केला होता. हे संपूर्ण प्रकरण गेल्या ७ वर्षापासून न्यायालयात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Breaking News : तिहेरी तलाक विधेयक मंजूर

News Desk

अयोध्या प्रकरणी २६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे – पंतप्रधान

News Desk