नवी दिल्ली | “सोनी टीव्ही हे सोनिया गांधी यांच्यापेक्षा अधिक समजतूदार आहेत”, या शब्दात भाजप खासदार परेश रावल यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल केलेल्या विधानानंतर अडचणीत आलेले काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू अडचणीत आले. परिणामी सिद्धू हे सोशल मीडियावर प्रचंड ट्रॉल झाले. याचाच आणखी एक परिणाम म्हणजे सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’मधून सिद्धू यांना बाहेरचा रस्ता दाखविला. या पार्श्वभूमीवर परेश रावल यांनी हा टोला लगावला आहे.
“काही लोकांसाठी संपूर्ण देशाला जबाबदार कसे ठरवले जाऊ शकते ? आपण कुणा व्यक्तीला जबाबदार ठरवू शकतो का ? हा भ्याड हल्ला होता. मी याचा निषेध करतो. ही घटना निंदनीय आहे आणि ज्यांनी हे केले आहे, त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. मात्र, हा प्रश्न चर्चेनेच सुटेल”, असे वक्तव्य नवज्योत सिंह यांनी हे वक्तव्य केले होते. जवानांवरील या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील जनता संतप्त असताना आणि ‘पाकिस्तानला धडा शिकवा’ ही एकमेव मागणी करत असताना सिद्धू यांनी केलेल्या या विधानावर लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.