HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील संसदेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून ते २६ जुलैदरम्यान

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून ते २६ जुलैदरम्यान होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड १९ जूनला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मोदींनी त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज (३१ मे) जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे गृहमंत्री पद देण्यात आले आहे. तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री देण्यात आले.

महाराष्ट्रातील सात खासदारांनासुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील मंत्रिमंडळामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. नव्या सरकारची काल (३१ मे) नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पहिल्या कॅबिनेटच्या शहिदांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा पहिला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणात मदतीसाठी ‘नेव्ही रेस्क्यू फोर्सची’ आवश्यकता, सुप्रिया सुळेंची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

News Desk

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

नोटबंदीने लागलाच नाही बनावट नोटांचा छडा रिझर्व्ह बँकेनेच केला खुलासा

News Desk