HW News Marathi
देश / विदेश

भारतातील निवडणूक काळात घेणार विषेश काळजी

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक डेटा चोरी प्रकरणी अमेरीकन कॉंग्रेस माफी मागितली आहे. फेसबुक व्दारे झालेल्या हलगर्जीपणाची जबाबदारी स्वीकारत भारतातीलआगामी निवडणूकी दरम्यान फेसबुक कडून सर्व काळजी घेण्यात येईल असा विश्वास दिला.

अमेरीकन कॉंग्रेसच्या समोर झालेल्या चुका स्वीकारताना लोकांनी पुन्हा एकदा फेसबुकवर विश्वासठेवावा यासाठी भारतात होणा-या आगामी निवडणूकीसाठी फेसबुक डेटा सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊ असा विश्वास मार्क यांनी व्यक्त केला आहे. अमेरिका कॉंग्रेस समोर बाजू मांडताना मार्क झुकरबर्ग म्हणाले, फक्त टुल्स बनवने ही आमची जबाबदारी नाही तर त्याचा वापर कसा आणि कुठे करावा हे सांगणे या टुल्सचा वापर चांगल्यारितीने करा असे आवाहन हि देखील आमची जबाबदारी आहे. हे सत्य आहे की काही टुल्सचा गैरवापर होण्यापासून आम्ही रोखू शकलो नाही.

खोट्या बातम्या, निवडणूकीत बाहेरील लोकांचाहस्तक्षेप, अपप्रचार या बाबी टाळण्यासाठी आम्ही योग्य ते पाऊल उचलू शकलो नाही. आम्ही आमची जबाबदारी योग्य रित्या निभावू शकलो नाही ही माझी सर्वात मोठी चुक आहे. या मोठ्याचुकीसाठी मी सर्वांची माफी मागतो. फेसबुक मी सुरु केले मी ते चालवतो त्यामुळे फेसबुक संदर्भात जे काही होईल त्यासाठी मी स्वता जबाबदार असेन अशा शब्दात मार्क झुकरबर्ग यांनी माफीमागितली.

कॉंग्रेस सीनेटच्या सुनावणी दरम्यान फेसबुकवर झालेल्या आरोपामुळे मार्क झुकरबर्ग यांच्यावर टिकेची झोड उठली होती. सुनावणीच्या वेळी मार्क झुकरबर्ग गंभीर होते. यावेळी कॉमर्सकमिटीचे चेअरमन सेन जॉन थ्यून म्हणाले, झुकरबर्ग तुम्ही आणि तुमच्या कंपनीने जी फेसबुकच्या माध्यमातून सोशल मिडीमध्ये जी लोकप्रियता मिळवली आहे ती अमेरिकेच्या नागरीकांचेप्रतिनिधीत्व करते.

जॉन म्हणाले अनेक लोक तुमच्या यशस्वी कहाणीतून प्रेरणा घेतात. त्यामुळे तुमच्यावर देखील काही जबाबदार्या आहेत त्या तुमच्या कामावर अवलंबून आहेत. त्यामुळेतुम्ही हे निश्चित करा की तुमची कंपनी आणि तीचा वापर करणा-या लाखो लोकांची विश्वासहार्ता कशी टिकून राहिल असेही यावेळी बोलताना चेअरमन सेन जॉन थ्यून म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत!

News Desk

वाहतूक नियम तोडल्यास आपल्या बँक खात्यातून जमा होणार दंड

News Desk

पुलवामा प्रकरणावरून ट्रोल करणाऱ्या नेटिझन्सना सानियाचे खडे बोल

News Desk