HW Marathi
देश / विदेश

रेल्वेने ३९२ ‘फेस्टिव्हल विशेष गाड्या’ चालवण्याचा घेतला निर्णय

नवी दिल्ली | देशात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. देशात नव्या कोरोना रूग्णांची नोंद होत असली तरी कोरोना संकटावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे दिलासा मिळत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्व लोकल गाड्या आणि एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु लॉकडाऊन उठवल्यानंतर अनलॉक प्रक्रियेच्या माध्यमातून काही प्रमाणात लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या ‘विशेष ट्रेन’ म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत.

सध्या सर्वत्र मोठ्या सणांची चाहूल लागली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधांची काळजी घेत रेल्वेने ३९२ ‘फेस्टिव्हल विशेष गाड्या’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय गाड्यांची यादी संबंधित झोनला पाठवण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. राजधानी, शताब्दीसह तेजस आणि हमसफर गाड्या देखील पुन्हा रेल्वे रुळावर धावणार आहेत. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत राजधानी, शताब्दी, तेजस आणि हमसफर एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. त्यामुळे आता रूळावर ४१६ विशेष गाड्या धावणार आहेत.

Related posts

काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रताप, शहीदांच्या श्रद्धांजली सभेत नेत्यावर उधळले पैसे

News Desk

एअर स्ट्राईकनंतर आता देशातील ५ मोठ्या शहरांना हाय अलर्ट

News Desk

#Article370Abolished : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आज काळा दिवस !

News Desk