HW News Marathi
Covid-19

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ हजार २८१, तर जगभरातील देशाच्या यादीत १२ व्या क्रमांकावर

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासाच ३ हजार ५२५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात १ हजार ९३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत ७४ हजार २८१ कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आहे. तर २४ हजार ३८६ लोकांचा कोरोनामुळे प्राण गमावले आहे. तसेच आतापर्यंत २४ हजार ३८५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१३ मे) दिली आहे.

देशात महाराष्ट्र राज्यात काल (१२ मे) ५३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये २४ बाधितांचा मृत्यू झाला असून त्यांपैकी अहमदाबादेत २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्र्यालायाने सांगितले आहे. दरम्यान, करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये भारत १२ व्या क्रमांकावर आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३,५४३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, ही माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.

देशातील कोणत्या राज्यात आतापर्यंतच्या बळी

  • महाराष्ट्र – ९२१
  • गुजरात – ५३७
  • मध्य प्रदेश – २२५
  • पश्चिम बंगाल – १९८
  • राजस्थान – ११७
  • दिल्ली – ८६
  • उत्तर प्रदेश – ८२
  • आंध्रप्रदेश – ४६
  • तामिळनाडू – ६१
  • तेलंगणा – ३२
  • कर्नाटक -३१
  • पंजाब – ३२
  • जम्मू-काश्मीर -१०
  • हरियाणा – ११
  • बिहार -६
  • केरळ ४
  • झारखंड -३
  • ओडीशा -३
  • चंदिगढ -३
  • हिमाचल प्रदेश – २
  • आसाम -२
  • मेघालय -१
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खुप आले,आम्ही त्यांना धडा शिकवू,संजय राऊत भिडेंवर भडकले !

News Desk

मतदारसंघामध्ये कोरोनाबद्दल जनजागृती अभियानात चव्हाणांना जाणवल्या अडचणी, मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

News Desk

देशाचा कोरोना रुग्णांचा आकडा ६२ लाखांच्या पार

News Desk