नवी दिल्ली | भारतीयांसाठी एक चांगली बातमी आली आहे. स्पुटनिक कोरोना लस भारतात आली आहे. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होणार आहे. रशियातून आता ज्या काही मर्यादित लसींचे डोस मिळाले आहेत, त्याची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे.
#Sputnik vaccine has arrived in India. I'm happy to say that we're hopeful that it'll be available in the market next week. We're hopeful that the sale of the limited supply that has come from there (Russia), will begin next week: Dr VK Paul, Member (Health), NITI Aayog#COVID19 pic.twitter.com/OGUTHvKCr9
— ANI (@ANI) May 13, 2021
रशियात तयार झालेल्या Sputnik V लसीची पहिली बॅचभारतात १ मेला दाखल झाली होती. हैदराबादमध्ये ही लस आलेली आहे. Sputnik V ने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीला आपल्याला हरवायचं आहे आणि आपण सर्वजण एकत्र येऊन ही गोष्ट नक्कीच करु शकतो असं Sputnik V ने म्हटलं आहे.
भारतात एकूण सहा टप्प्यांमध्ये ही लस आणली जाणार असून पहिला टप्पा मे महिन्यात आलेला आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस नागरिकांना दिली जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.