HW Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाकडून श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी उठविली

नवी दिल्ली | आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे बीसीसीआयकडून आजीवन बंदी घातलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयाने आज (१५ मार्च) दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतच्या खेळावर घातलेली बंदी हटविल्याने आता पुन्हा श्रीसंत खेळू शकणार आहे. इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतच्या खेळावर बंदी घालण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचा ३ महिन्यात पुर्नविचार करावा, असा आदेश देखील दिला आहे.

२०१३ सालच्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर श्रीसंतला क्लीन चिट मिळाली होती. या प्रकरणी बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदीसह १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालायने श्रीसंतला या प्रकरणी दिलासा दिला असून श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Related posts

परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स

News Desk

कमांडर अभिलाष यांना सुखरूपपणे वाचविण्यात यश

Gauri Tilekar

पथनाट्याच्या माध्यमातून जागतिक स्तनपान सप्ताह होतोय साजरा 

अपर्णा गोतपागर