नवी दिल्ली | श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या सुरक्षा दलाने सुरु केलेल्या कारवाईत १५ जणांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. श्रीलंकेच्या पूर्व भागात सुरक्षा दलाने ही कारवाई केली. या १५ जणांपैकी ३ जण इस्लामिक स्टेटचे आत्मघाती दहशतवादी असल्याची शंका देखील व्यक्त केली जात आहे. तर यात ६ मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता श्रीलंकेतील पूर्व भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
AFP quoting Sri Lanka Police: 15 killed in raid on Islamist hideout
— ANI (@ANI) April 27, 2019
पोलिस प्रवक्ते रुवान गुनासेकरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील सुरक्षा दलाने शुक्रवारी (२६ एप्रिल) रात्री सम्मनतुरई शहराजवळील एका संशयित ठिकाणी छापा घातला. याचवेळी दहशतवाद्यांनी ३ स्फोट घडवून आणले तर एका संशयिताने आत्मघाती हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात १५ जण ठार झाले. या १५ जणांपैकी ३ जण इस्लामिक स्टेटचे आत्मघाती दहशतवादी असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
AFP: Sri Lanka troops kill two suspected IS gunmen, says official
— ANI (@ANI) April 27, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.