श्रीनगर | श्रीनगरच्या जवळ असलेल्या मुजगुंड भागात शनिवार संध्याकाळपासून (८ डिसेंबर) मोठी चकमक सुरु आहे. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या या चकमकीत एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह एकूण २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय लष्कराला यश आले आहे. या चकमकीत ५ जवान जखमी झाले आहेत. या चकमकीची बातमी परिसरात पसरताच या भागांत येथील संतप्त तरुणांनी भारत विरोधी घोषणा देत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरु केली. अखेर जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षादलांना लोकांवर लाठीचार्ज करावा लागला.
#UPDATE: Mobile internet services have been suspended in Srinagar following the Mujgund encounter which is underway there since yesterday. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) December 9, 2018
शनिवारी संध्याकाळी मुजगुंड भागातील एका घरात ३ ते ४ दहशतवादी लपून राहिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुजगुंड येथील शेख हमजा शाळेजवळील एका घरामध्ये दहशतवादी लपून राहिले होते. ही माहिती मिळताच भारतीय जवान, पोलीस आणि सीआरपीएफने या संपूर्ण परिसराला घेराव घातला. दरम्यान ही चकमक आजही सुरु असून सुरक्षेच्या कारणास्तव येथील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.