नवी दिल्ली | दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जिंदमध्ये महापंचायत सुरु होती. त्यावेळी शेतकरी आंदोलक आणि नेते महेंद्रसिंह टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळले. त्यावेळी राकेश टिकैत यांनी परिस्थिती सावरत व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे तुटतात, अशी कोटी केली. हरियाणाच्या जिंदमध्ये कंडेला इथं शेतकऱ्यांची महापंचायत सुरु आहे. या महापंचायतीला संबोधित करण्यासाठी महेंद्रसिह टिकैत उपस्थित झाले आहेत. या ठिकाणी ५० खाप पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी झाली आहे. त्याच दरम्यान टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळल्याची घटना घडली आहे.
#WATCH | The stage on which Bharatiya Kisan Union (Arajnaitik) leader Rakesh Tikait & other farmer leaders were standing, collapses in Jind, Haryana.
A 'Mahapanchayat' is underway in Jind. pic.twitter.com/rBwbfo0Mm1
— ANI (@ANI) February 3, 2021
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा ७० वा दिवस आहे. दिल्लीच्या सिंधू, टिकरी आणि गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकरी अजूनही तळ ठोकून आहेत. दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत आज हरियाणातील जिंद इथं महापंचायतीला संबोधित करण्यासाठी पोहोचले आहेत. टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आणि महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी टिकैत यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच ते उभे असलेलं व्यासपीठ कोसळलं. त्यावेळी एकच गोंधळ उडाल्याची चित्र पहायला मिळालं. पण टिकैत यांनी परिस्थितीचं भान ओळखून व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे कोसळतात अशी कोटी केली. त्यामुळे वातावरण हलकं होण्यास मदत झाली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.