पुरी | आजपासून ओडीसाच्या पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथ यात्रेला सुरुवात झाली आहे. जगभरातून लाखो भाविक आज पुरीमध्ये या यात्रेसाठी दाखल आहेत. आषाढ शुक्ल व्दितीयापासून जगन्नाथ यात्रेला सुरूवात होते. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात वारीचे महत्व असते, त्याच प्रमणे ओडीसामध्ये जगन्नाथ यात्रेला महत्व असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर जगन्नाथ रथ यात्रेच्या शुभेच्छा दिल्या असून आपल्या देशची प्रगती व्हावी असा आशिर्वाद भगवान जगन्नाथ घेऊ, सर्व भाविकांना दर्शनांने आनंद आणि समृद्ध लाभो असा शुभ संदेश नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिला आहे.
Greetings on the auspicious occasion of Rath Yatra.
With the blessings of Lord Jagannath, may our country scale new heights of growth. May every Indian be happy and prosperous.
Jai Jagannath! pic.twitter.com/1Ifrxueaiu
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2018
ओडिसा राज्यातच हा उत्सव साजरा केला जात नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी आज हा उत्सव साजरा केला जातो. अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथाच्या यात्रेला सकाळी ७ च्या सुमारास सुरुवात झाली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आज जगन्नाथ यात्रेत सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री विजय रुपाणी जगन्नाथ मंदिरात पोहोचले आहेत. याआधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी रथाला खेचून या रथ यात्रेची सुरुवात केली.
Greetings on the occasion of #RathYatra. May Lord Jagannath bestows upon us peace, prosperity & overall happiness. pic.twitter.com/axOJwyunmu
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) July 14, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.