HW News Marathi
देश / विदेश

तपासासाठी मशिदीत गेलेल्या पोलिसांवर लोकांकडून दगडफेक

नवी दिल्ली | संपूर्ण जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ही अत्यंत चिंताजनक बाब बनली आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, तरीही आकडा वाढतोच आहे त्यात आता दिल्लीत संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. दिल्लीत मुस्लिम समाजाच्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या २ हजारांहून अधिक लोकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील लोक या कार्यक्रमात सहभागी असल्याने आता संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे.

दिल्लीतील या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा पोलीस शोध घेत असताना उलट लोकांकडून पोलिसांवरच दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. सध्या पोलिसांकडून अनेक राज्यांमध्ये तपास सुरु आहे. मात्र, या काही नागरिक पोलिसांना याच सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. गंभीर म्हणजे यातले काही लोक मशिदीमध्ये लपवल्याचे, तर परदेशातून आलेल्या मुस्लिमांनाही लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे समजल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, तपासासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याचा प्रकार बिहारमधील काही ठिकाणी मशिदींमध्ये घडला आहे.

बिहारमधील काही मशिदींमध्ये लोकांना लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनासथळी दाखल होताच तेथील जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. इतकेच नव्हे तर येथील लोकांनी पोलिसांच्या गाड्यांच्या काचाही फोडल्याचे समजते आहे. याप्रकरणी आता ४ जणांना अटक करण्यात आली आहे तर १५ जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रिय गृहमंत्रालयाकडून अनलॉक ६ च्या गाईडलाईन्स जारी!

News Desk

आता बेटांचे ही नामांतर

News Desk

अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांना २१ व्यांदा ऑस्करमध्ये नामांकन

News Desk