HW News Marathi
देश / विदेश

तुर्कस्तानमध्ये 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

मुंबई | तुर्कस्तानमध्ये (Turkey) 7.8 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपात (Earthquake) 237 हून अधिक लोकांचा बळी गेल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. तुर्कस्तानच्या गाझियान्टेप शहराजवळ भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते. या भूकंपामुळे तुर्कस्तान मोठा विध्वंस झाले आहे.  या भूकंपानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक अडकल्याची भीती वाढली जात असून अनेक लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या भूकंपाची तीव्र ऐवढी होती की, सिरीया, लेबनान, सिपरस,जॉर्डन, इजिप्त  आणि इजराइललामध्ये हादरे बसले आहेत. तुर्कीमध्ये हा भूकंप भारतीय वेळेनुसार 4.17 वाजताच्या सुमारात झाला होता. तुर्कस्तानवर भूकंपाचे नैसर्गिक आपत्तीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हणाले, “तुर्कस्तानमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्यामुळे दुःख झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत ज्यांनी आपले नातेवाईकांना गमावलेल्या व्यक्तींच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी लवकर बरे व्हावे. भारत तुर्कस्तानच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”

 

तुर्कस्तान भूकंपानंतर हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहे. तुर्कस्तानच्या भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये भूकंपाची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. तुर्कस्तानच्या भूकंपाचा एक व्हिडिओ बीएनओ न्यूजने ट्वीट करत माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामंत गोयल यांची ‘रॉ’च्या प्रमुखपदी निवड

News Desk

भाजपश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत कमलनाथ सरकार पाडू !

News Desk

राहुल गांधी यांचे ट्विटर हँडलवरील नाव, फोटोसहीत स्टेटस अपडेट

News Desk