HW News Marathi
देश / विदेश

मुलांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांनाच अटक

लखनऊ – उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन अभावी तिनशेहून अधिक बालकांचा जीव गेला. लाखो रुपयांचे बील थकल्याने कंत्राटदाराने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला होता. त्यामुळे रूग्णालयात उपचार घेण्याऱ्या मुलांची मृत्यू झाला. परंतु ऑक्सिजनचा पुरवठा कमी असताना काही मुलांना जीवदान देणाऱ्या डॉ. काफील खान यांनाच अटक करून योगी सरकारने पुन्हा एकदा आपल्या वाद ओढावून घेतला आहे. डॉ. काफील केवळ मुस्लीम असल्याने योगी सरकारने सूडबुद्धीन त्यांच्यावर ही कारवाई केल्याची प्रतिक्रीया खान यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

गोरखपूरमध्ये आतापर्यंत तिनशेहून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याची नैतिक जबाबादारी स्वीकारण्याचे सोडून योगी सरकारने महाविद्यालयाच्या डीनसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केवळ खान यांनाच अटक करण्यात आली. या कारवाईचा डॉक्टरांच्या संघटनेने निषेध केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोपर्डी प्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली

News Desk

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष, जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल…

News Desk

अवघ्या चौदा मिनिटांत अमेरिका नष्ट करणार, उत्तर कोरियाची धमकी

News Desk