HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत पुन्हा विद्यार्थी हत्याकांड

नवी दिल्ली | दिल्लीतील एका प्रसिद्ध शाळेमध्ये 16 वर्षाच्या युवकाचा मृत्यदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी रेयान स्कूलमध्ये प्रद्मुन्म नावाच्या मुलाचा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ही घटना घडल्याने दिल्लीतील मुले सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील सादतपूर येथील इंटर कॉलेज जीवन ज्योती स्कूलमध्ये 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

तुषार असे त्याचे नाव असूऩ तो इयत्ता नववीतील विद्यार्थी होता. तुषारचा मृतदेह शाळेतील बाथरुममध्ये संशयास्पदरित्या आढळला. तुषार आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे प्रकरण प्रद्युम्न हत्याकांड प्रमाणे असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. प्रद्युम्न हत्याकांडप्रमाणेच तुषारचाही मृतदेह बाथरुममध्ये आढळून आला आहे. सकाळच्या सुमारास शाळेत होणा-या प्रार्थनेच्या वेळेदरम्यान त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

News Desk

वाहतूक नियम तोडल्यास आपल्या बँक खात्यातून जमा होणार दंड

News Desk

जेटचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांना देशाबाहेर जाताना अडविले

News Desk