नवी दिल्ली | नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देत लहान बचत योजनांमध्ये व्याजदराची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारने निर्णय मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नजरचुकीने हा आदेश प्रसिद्ध झाल्याचं ट्विट केलं आहे. यानंतर भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आश्चर्यकारक म्हणत संपूर्ण मंत्रिमंडळालाच नजचुकीची समस्या असल्याची टीका केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं आहे. आश्चर्यकारक! अर्थमंत्रालयाला नजरचुकीची समस्या आहे? संपूर्ण मंत्रिमंडळालाच नजरचुकीची समस्या आहे ? असं सुब्रमण्यम स्वामींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Amazing! MoF has oversight problem? A whole Ministry has an oversight problem?
— Subramanian Swamy (@Swamy39) April 1, 2021
काय आहे प्रकरण?
लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाकडून मागे घेण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहतील असं स्पष्ट केलं आहे. निर्मला सीतारमन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
निर्मला सीतारमन यांनी ट्विटमध्ये काय?
केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांवरील व्याजदर २०२०-२०२१ च्या शेवटच्या तिमाहीत होते तेच राहतील, म्हणजेच मार्च २०२१ पर्यंतचे दर. नजरचुकीने प्रसिद्ध करण्यात आलेला आदेश मागे घेण्यात येईल असं निर्मला सीतारमन यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.
Interest rates of small savings schemes of GoI shall continue to be at the rates which existed in the last quarter of 2020-2021, ie, rates that prevailed as of March 2021.
Orders issued by oversight shall be withdrawn. @FinMinIndia @PIB_India— Nirmala Sitharaman (@nsitharaman) April 1, 2021
काय होता निर्णय?
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (१ एप्रिल ते ३० जून २०२१) नवे व्याजदर जाहीर करण्यात आले होते. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ०.७ टक्क्याने कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला होता. पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याज वार्षिक ४ वरून ३.५ टक्के करण्यात आले होते. एक वर्षांच्या मुदतठेवींवरील व्याजदर ५.५ वरून ४.४ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज ७.४ वरून ६.५ टक्के करण्यात आले होते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६.८ वरून ५.९ टक्के तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर ६.९ टक्क्यांवरून ६.२ टक्के करण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.