श्रीहरीकोट्टा | भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेले ‘चांद्रयान-२’ सोमवारी (२२ जुलै) दुपारी ठीक २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात झेपावले आहे. ‘बाहुबली’ (GSLVMkIII-M1) नावाच्या रॉकेटच्या साहाय्याने अवकाशात झेपावले आहे. भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ६ सप्टेंबर रोजी चांद्रयान-२ चंद्रावर दाखल होईल. दरम्यन, या ‘चांद्रयान-२’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर “भारताच्या चंद्रावर जाण्याच्या ऐतिहासिक प्रवासाची ही सुरुवात आहे. चांद्रयान-२ चे यशस्वी उड्डाण हा भारताच्या तिरंग्याचा सन्मान आहे” , असे म्हणत इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ISRO Chief K Sivan: I’m extremely happy to announce that the #GSLVMkIII-M1 successfully injected #Chandrayaan2 spacecraft into Earth Orbit. It is the beginning of a historic journey of India towards moon & to land at a place near South Pole to carry out scientific experiments. pic.twitter.com/vgNXVNOcSr
— ANI (@ANI) July 22, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.