HW News Marathi
देश / विदेश

सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुनील अरोरा यांची निवड झाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याला मंजुरी दिली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०१८ रोजी संपणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे दोन डिसेंबरला अरोरा अधिकृतपणे त्यांचा पदभार स्वीकारतील. २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका सुनील अरोरा यांच्या कार्यकाळात होणार आहेत.

६२ वर्षीय सुनील अरोरा हे १९८० च्या राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अशा महत्वाच्या पदावर काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफीच्या बदल्यात ‘सेक्स’

News Desk

नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया..

News Desk

welcome2019 : देशासह जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

News Desk