HW Marathi
देश / विदेश

राफेल प्रकरणी केंद्र सरकारला मोठा धक्का, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

नवी दिल्ली | राफेल डील प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवर आज (१० एप्रिल) झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप  फेटाळला आहे. तर कोर्टात सादर करण्यात आलेली कागदपत्रे वैध असल्याचे म्हटले आहे.

राफेल व्यवहार प्रकरणी दिलेल्या निकालावर भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर सरकारने या याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. त्यावर आज न्यायालयाने फैसला दिला.

याआधी ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरीला गेल्याचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. त्यानंतर वेणुगोपाल यांनी केलेल्या वक्तव्यावर यू टर्न घेताना मंत्रालयातून कागदपत्रे चोरी झाली नसल्याचा दावा केला होता. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे प्रकाशित करू शकत नाही, असे ॲटर्नी जनरल यांनी याआधी म्हटले होते.

Related posts

केंद्राच्या सूचनेनंतर युट्युबने कमांडर अभिनंदन यांचे आक्षेपार्ह व्हिडीओज हटविले

News Desk

४८ तासांसाठी इंटरनेट सेवा राहणार बंद ?

News Desk

खेळाडू, कलाकारांनी केला कठुआ बलात्काराचा निषेध

News Desk