HW Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली | बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहे. लालू यांनी प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज(१० एप्रिल) सुनावणीत लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळून लावली आहे.

न्यायालयाने जामीन याचिका फेटाळल्यामुळे पहिल्यांदा लालू लोकसभा निवडणुकीच्या सहभागी होता येणार नाही. निवडणुकीत लालू यांचे दोन मुलांमध्येही एकमत नसल्‍याचे चित्र सध्या दिसत आहे. लालूचा मोठा मुलगा तेज प्रताप याने राजद विरोधात लालू राबडी असा नवीन मोर्चा उघडला आहे. लालू यांच्या जामीन याचिकेला सीबीआयने विरोध केला. चारा घोटाळ्याप्रकरणी लालूला २७ वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.

मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने सुनावणी झाली आहे. लालू यादव हे गेल्या ८ महिन्यांपासून रुग्णालयामध्ये आहेत. लालू यांना रुग्णालयामध्ये राहण्यासाठी विशेष सुविधा दिली जात आहे. तसेच त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लालू यांना१९७७ सालानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकणार नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू यांनी आपल्या पार्टीसाठी प्रचार केला होता.

Related posts

एकाच परिवारातील चार जणांनी केली आत्महत्या

News Desk

छुप्या पद्धतीने उत्तर कोरीया बनवतेय जैविक हत्यारं 

News Desk

मोदी देशवासीयांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही | राहुल गांधी

अपर्णा गोतपागर