HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण दोषी 

नवी दिल्ली | न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च नायायालयाने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना दोषी ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर २० ऑगस्ट रोजी न्यायालयात शिक्षेवर सुनावणी होणार आहे. प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या मोटारसायकलवरील एका फोटोवर टिपण्णी केली होती. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत नोटीस पाठवली आहे. काहीच दिवसांपूर्वी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपूरमधील राजभवनातील मोटारसायकलवरचा एक फोटो प्रचंड चर्चेत आला होता. याच पार्श्वभूमीवर प्रशांत भूषण यांनी एक ट्विट केले होते.

गेल्या ६ वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर प्रशांत भूषण यांनी ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेले भाष्य न्यायालयाचा अवमान करणारे असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांच्या ट्वीट्सबद्दल त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागत २२ जुलै रोजी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर, आज न्यायालयाने प्रशांत भूषण यांना या प्रकरणी दोषी ठरवले आहे.

प्रशांत भूषण काय म्हणाले होते ?

सर्वोच्च न्यायालयाने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देताना प्रशांत भूषण म्हणाले कि, “मतांची अभिव्यक्ती कितीही स्पष्ट, मान्य न होण्यासारखी आणि काही जणांना न रुचणारी असली तरीही त्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही”. त्याचप्रमाणे, आपले माझे ट्विट हे न्यायाधीशांच्या वैयक्तिक वागण्याबाबत होते. त्यात कुठेही न्यायव्यवस्थेवर टीका करण्यात आलेली नाही, असेही स्पष्टीकरण प्रशांत भूषण यांनी दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावरील सुनावणी आता पुढील वर्षी

News Desk

स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत राहणार का? काय म्हणाले नाना पटोले वाचा

News Desk

मोदी सरकारला मोठा धक्का ! कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची अंतरीम स्थगिती

News Desk