नवी दिल्ली | ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सीबीआय प्रकरणी ट्वीट केल्याने अडचणीत आले आहे. सीबीआय प्रमुख आलोक वर्मा रजेवर असताना एम. नागेश्वर राव यांना सीबीआयचा कार्यभार सोपवण्यात आला होता. तसेच, संसदीय समितीने आलोक वर्मा यांच्याकडून सीबीआय प्रमुखपद काढून घेतले होते. या दोन घटनांबद्दल अॅटॉर्नी जनरल वेणुगोपाल यांनी दिलेल्या मतांवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर प्रशांत भूषण यांनी ट्विटरवरून ताशेरे ओढले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना नोटीस बजावली आहे.
Supreme Court issues notice to advocate Prashant Bhushan on contempt plea filed by Attorney General KK Venugopal and Centre that Bhushan in his tweets said that AG Venugopal 'wilfully&deliberately' made false statement in a case pending in court. Next date of hearing is March 7.
— ANI (@ANI) February 6, 2019
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलाने अॅटॉर्नी जनरल यांचा अपमान करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ मार्च रोजी होणार आहे. न्या. अरुण मिश्रा आणि न्या नवीन सिन्हा यांचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत. या सुनावणी वेळी नेमके काय स्पष्टीकरण देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.