HW News Marathi
Covid-19

“आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका,” सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

नवी दिल्ली | दिल्लीतील कोरोना परिस्थितीवरुन सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावले आहे. दरम्यान, केंद्र सरकारला पुढील आदेशापर्यंत दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. केंद्राकडून दिल्ली सरकारला नुकतंच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं की, दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनता पुरवठा झाला पाहिजे. “प्रत्येक दिवशी, ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन दिल्लीच्या रुग्णयांना दिला जावा. पुढील आदेशापर्यंत हा पुरवठा असाच केला जावा”. दरम्यान यावेळी कोर्टाने आम्हाला सरकारविरोधात कठोर निर्णय घ्यावे लागतील अशी परिस्थिती निर्माण करु नका अशा शब्दांत फटकारलं आहे.

दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी कोर्टाला माहिती देताना, मध्यरात्रीपर्यंत ५२७ मेट्रिक टन आणि सकाळी ९ वाजेपर्यंत ८९ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला असल्याची माहिती दिली. सुप्रीम कोर्टाने प्रत्येक राज्याला ऑक्सिजनची किती गरज आहे हे जाणून घेण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ६५ लाख ५५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप, छगन भुजबळ यांची माहिती

News Desk

‘भारतीय क्रिकेट संघाला मोठा फटका,’ ऋषभ पंतला कोरोनाची लागण!

News Desk

पुढच्या काही तासांत महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे स्पष्ट संकेत!

News Desk