HW News Marathi
देश / विदेश

नवीन वाहन खरेदी करणारांसाठी सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली | नवीन गाडी एक सप्टेंबर नंतर घेणा-या गाडी मालकांना किमान तीन वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश दिला असून चार चाकी गाड्यांना तीन वर्षांचा तर दुचाकी गाड्यांना पाच वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढणे आता अनिवार्य असणार आहे.

विमा काढल्याशिवाय नवीन गाडीची विक्री करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सध्याच्या तरतुदींनुसाार वाहनचालक एका वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढतो आणि नंतर दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे अपेक्षित असते. थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे कार अथवा दुचाकीचा दुसऱ्या कुणाशी अपघात झाला तर त्रयस्थांना असलेले विम्याचे संरक्षण. या प्रकारच्या विम्यामध्ये स्वत:च्या गाडीचे नुकसान झाले तर भरपाई मिळत नाही. सर्वसमावेशक किंवा कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स घ्यावा लागतो. सुप्रीम कोर्टाने हा आदेश केवळ थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या संदर्भात केला असल्यामुळे सर्वसमावेश इन्शुरन्स असलेल्यांना एका वर्षाचे नूतनीकरण करणे शक्य होणार आहे.

रस्ते सुरक्षा विषयक समितीने सुचवलेल्या अटी सुर्पीम कोर्टाच्या न्यायमूर्ती मदन लोकूर व दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने स्वीकारल्या आहेत. अनेक कारचालक पहिल्या वर्षाचा थर्ड पार्टी विमा संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करत नाहीत आणि त्यानंतर अपघातात बळी पडलेल्यांना विम्याचे संरक्षण मिळत नाही असे निरीक्षण नोंदवत ही तीन व पाच वर्षांची विम्याची तरतूद लागू करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#NirbhayaCase: दोषी विनय शर्माची याचिका न्यायालयाने फेटाळली

swarit

सवर्ण आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर

News Desk

#CoronaVirus | रविवारी संघाच्या शाखा सुरुच राहणार, पण …!

News Desk
महाराष्ट्र

मराठा समाजाचे मुंबईत ठिय्या आंदोलन

News Desk

मुंबई । मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण लागू व्हावे, २० जुलै पासून मराठा समाजाने ठिय्या आंदोलन पुकारले आहे. परळी येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरु झाली आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत सरकारने मेगाभरती थांबवावी. अशी आंदोलकांनी मागणी केली . दरम्यान सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला. यावेळी आयोजक युवराज सूर्यवंशी, महेश राणे, अभिजित सावंत, सूयाजी पाटील, इ. आयोजक उपस्थित होते.

Related posts

फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात वसुलीसाठीच संघाचे लोक नेमले होते का? याची चौकशी करावी

News Desk

अहेरी शहरातील सुसज्ज बाजारवाडीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाच्या वेळवरून शिवप्रेमीमध्ये नाराजी

Aprna