HW News Marathi
देश / विदेश

बंडखोर आमदारांच्या तात्काळ बहुमत चाचणी सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली | बंडखोर आमदारांच्या तात्काळ बहुमत चाचणी सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस-जेडीएसच्या दोन बंडखोर आमदारांनी आज (२२ जुलै) तात्काळ बहुमत चाचणी कराण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटळून लावली आहे.

यामुळे बहुमत चाचणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी उद्या (२३ जुलै) ११ वाजेपर्यंत भेटावे, विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी आदेश दिले आहे. कर्नाटकचे विधानसभा अध्यक्षांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना सहापर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे.

कुमारस्वामींनी गेल्या गुरुवारी (१८ जुलै) विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडला होता. यावरून चर्चा घडवत गुरुवारचे मतदान शुक्रवारी (१९ जुलै) नेले होते. मात्र, राज्यपालांनी हस्तक्षेप केल्याने कुमारस्वामींनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर मागितले होते. तत्पूर्वी बंडखोर आमदारांना उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यावरही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत ही संविधानाची आणि पक्षाच्या अधिकाराची गळचेपी असल्याचे म्हटले होते. या वादात हे मतदान सोमवारपर्यंत ढकलण्यात काँग्रेस आणि जेडीएस यशस्वी ठरली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी मराठीतून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

News Desk

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक, एकनाथ शिंदेंनी बैठकीनंतर दिली ‘ही’ माहिती

News Desk

तरूणींने ढोंगी बाबाचे लिंग छाटले

News Desk