नवी दिल्ली | निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपी अक्षय कुमार सिंह याने फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने आज (१८ डिसेंबर) सुनावणीदरम्यान आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार नाही, असे म्हणत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. यामुळे आरोपी अक्षय कुमार सिंह यांची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मला आनंद असल्याची प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने माध्यमांना दिली आहे.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim, to ANI on SC rejects review petition of convict Akshay: I am very happy. (file pic) https://t.co/XI5HmYM8fU pic.twitter.com/U6K3qQXiKa
— ANI (@ANI) December 18, 2019
याआधी या प्रकरणाताल विनय, पवन आणि मुकेश या दोषींनी अशाच प्रकारची याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्या सर्व याचिका फेटाळून लावत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. अक्षय कुमार सिंहच्या वकिलांनी दिल्लीतील प्रदूषण आणि खराब हवेचा दाखला देत, फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, त्यावर कोणत्याही परिस्थितीत या गुन्ह्यात माफी दिली जाऊ शकत नाही आणि दोषींना फाशीची शिक्षाच व्हायला हवी, असे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.