नवी दिल्ली। निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी पवन गुप्ताच्या (स्पेशल लीव्ह पिटीशन) याचिकेवर आज (२० जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुन्हा घडला पवन गुप्ताच्या हा अल्पवयीन होता, असे या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावू नये, असे आरोपींने त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए एन बोपण्णा यांचे खंडपीठ पवन गुप्ताच्या याचिकेवर सुनावणी करणार आहेत.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: It is just a tactic to delay the execution. His petition was cancelled in 2013 by SC. Review petition was also dismissed by the court. He's doing it just to waste time. But all the convicts must be executed on 1 Feb only. https://t.co/NdTEstgtqE pic.twitter.com/qoxy3pyb1D
— ANI (@ANI) January 20, 2020
याआधी दिल्ली उच्च न्यायालयानेही पवनचा अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळला होता. तसंच वकिलांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. दोषी पवन गुप्ताने न्यायालयाने दिल्लीच्या पटियाला न्यायालयाच्या १९ डिसेंबरच्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यात बनावट कागदपत्रे सादर करणे आणि न्यायालयाने हजर न राहण्याबाबत वकिलांना फटकार लगावली होती.
आज आरोपीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कायदेतज्ञांच्या मते ही याचिका फेटाळली जाण्याची शक्यता अधिक आहे. आरोपी पवनची याचिका न्यालयाने फेटाळली तर त्याला राष्ट्रपतींकडे दया अर्ज करण्याचा पर्याय असणार आहे. याआधी दोषी मुकेशचा दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावला होता.निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयाने ‘डेथ वॉरंट’ जारी केले आहे. यानुसार १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.