नवी दिल्ली | राज्यात, देशात अनेक विषय हे राजकीय वर्तृळात गाजत आहेत. दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. तसेच, त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यात भाजपच्या काही नेत्यांची नावं होती असंही समोर आलं होतं. दरम्यान, महाराष्ट्रात हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला असला तरी दिल्लीच्या लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर अनेक खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मोहन डेलकर यांच्या मृत्यूचा तपास योग्यरित्या व्हावा यासाठी निवेदन केले आहे. तसेच, सुप्रिया सुळे यांनी यात असेही नमुद केले आहे की, महाराष्ट्राच्या गृहखात्याने याचा तपास SIT कडे दिला आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधी पक्षाच्या खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत एक निवेदनही दिले. सुप्रिया सुळे यांनी या निवेदनात खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि तेवढीच धक्कादायकही आहे. सातवेळा खासदारकी भूषवणारे मोहन डेलकर इतके निराश झाले होते, वैफल्यग्रस्त झाले होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आपण आपल्या सहकाऱ्याला गमावलं आहे. तुम्ही लोकसभेचे प्रमुख आहात. त्या नात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जावी अशी मागणी केली. दरम्यान भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ते उपाय योजण्याची गरज आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या पत्रात सुचवले आहे.
दरम्यान, दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहेत. तसेच दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावरही गुन्ह दाखल करण्या आला आहे. डेलकर यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी काल मला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
Met Hon. @loksabhaspeaker – @ombirlakota Ji to raise concerns regarding the untimely demise of Late Shri. Mohan Delkar – MP – Dadar and Haveli along with Prof.Sugata Roy, Anubhav Mohanty, Ritesh Pandey, Shriniwas Patil, Ram Sharoman Verma and N.K Premachandran. pic.twitter.com/VlnpTXaVvF
— Supriya Sule (@supriya_sule) March 9, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.