नवी दिल्ली | बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी बिहार सरकारने मागणी केली होती ती आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी CBIकडे सोपवण्यात आली आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या नितीशकुमार यांच्या मागणीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात माहिती दिली.
Centre informs SC Bihar government's recommendation for CBI probe into death case of actor Sushant Singh Rajput has been accepted
— Press Trust of India (@PTI_News) August 5, 2020
मुंबईत त्याची आत्महत्या झाली होती. मात्र, पाटणा मध्ये त्याच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्याने बिहार पोलीस देखील याचा तपास करत होते. मात्र, याची चौकशी अतर सीबीआय कडे सोपवण्यात आल्याने या प्रकरणाला एक नवे वळण येणार आहे.
“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी होत होती. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे या प्रकारची चौकशी सीबीआयकडे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे गृहमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, “अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी ही संपूर्ण देश आणि विशेषत: देशातील तरुणांची भावना आहे. त्यामुळे मी गृहमंत्र्यांना अशी विनंती केली आहे कि, ही राष्ट्रीय भावना विचारात घेऊन या प्रकारची सीबीआय चौकशी सुरु करावी”, अशी माहिती पार्थ पवार यांनी स्वतःच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.