नवी दिल्ली | जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आग्रा येथील ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मूळचा फिरोजाबादचा असणाऱ्या या तरुणाने फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर परिसरात खळबळ माजली होती. सर्व पर्यटकांना ताजमहालमधून बाहेर काढत दरवाजे बंद करण्यात आले होते.
मात्र, नंतर तपासादरम्यान ही अफवा असल्याचं समोर आलं आहे.आज (४ मार्च) सकाळी ताजमहाल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात फोनमुळे सुरक्षा खडबडून जागी झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. संपूर्ण परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेनं सुटकेचा श्वास टाकला. दरम्यान, फेक कॉल प्रकरणात फिरोजाबादच्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. फेक कॉल करण्यामागचा तरुणाचा खुलासा ऐकल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
We'd received info from control room that a man called them up saying that there are discrepancies in military recruitment & he wasn't recruited. A Bomb is kept at Taj Mahal which will explode soon. Security check is being done around Taj Mahal: Shiv Ram Yadav, SP (Protocol) Agra pic.twitter.com/crr8x8sb43
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2021
कंट्रोल रुमच्या माध्यमातून पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर ताजमहालच्या आत स्फोटकं ठेवण्यात आल्याची सूचना गुरुवारी सकाळी सुरक्षा यंत्रणांना एका अज्ञात फोन कॉलवरून मिळाली होती. ‘ताजमहालात ठेवण्यात आलेल्या स्फोटकं थोड्याच वेळात फुटतील’, अशी धमकी फोन करणाऱ्यानं दिली होती.
ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आल्यानंतर पर्यटकांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं होते. अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर सीआयएसएफ जवानांनी तात्काळ तिथे उपस्थित पर्यटकांना बाहेर काढलं होत. यानतंर ज्या क्रमांकावर फोन आला त्यासंबंधी तपास केला असता ही अफवा असल्याचं समोर आलं. तरुणाची ओळख पटली असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
आगरा: ताजमहल परिसर में बम ब्लास्ट की सूचना मिलने के बाद परिसर में सर्च किया जा रहा है। pic.twitter.com/qPDJQfzGed
— ANI_HindiNews (@AHindinews) March 4, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.