ग्वालेर, मध्येप्रदेशातील दतिया शहरात एका 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडलेल्या शिक्षिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे,.
दतियामध्ये बीएसएनएल ऑफीसजवळच्या पंडो वस्तीत राहणारी विवेचना शर्मा त्यांच्या घराजवळ राहणा-या एका 16 वर्षीय मुलाची शिकवणी घ्यायची. हा मुलगा 9 व्या वर्गात आहे. मुलाची शिकवणी घेत असताना विवेचना आणि त्या मुलामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. यावर्षी करवा चौथ व्रताच्या दिवशी विवेचना आणि मुलागा एकत्र भेटताना एका नातेवाईकाने पाहिले. दोघांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर विवेचनाने त्या मुलाची शिकवणी बंद केली आणि शिक्षक भरतीची तयारी सुरु केली.
बुधवारी सकाळी विवेचना नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी गेली व आठ वाजता घरी परतल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराचवेळ विवेचना कुठे दिसली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. जेव्हा ते पूजेच्या रुममध्ये गेले. तेव्हा आतून दरवाजा बंद होता. विवेचनाच्या भावाने खिडकीतून पाहिले तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. त्यांनी हातोडयाने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व विवेचनाचा श्वास सुरु आहे का ते तपासले पण विवेचनाचा मृत्यू झाला होता.
पोलिसांच्या माहिती नुसार अल्पवयीन प्रियकर व त्याच्या चुलत भावाने आज सकाळी घरी फोन केला होता अशी माहिती विवेचनाच्या भावाने दिली. त्या मुलाने आम्हाला चर्चेसाठी घरी बोलावले होते. आम्ही तिथे जाणार होतो पण त्याआधीच विवेचनाने आत्महत्या केली असे त्याने सांगितले. आत्महत्येच्या घटनेनंतर अल्पवयीन प्रियकर आणि तिच्या चुलत भावाने मोबाईल बंद केला असून दोघे फरार झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.