HW Marathi
देश / विदेश

प्रवाशांचा प्रतिसाद येत नसल्याने तेजस एक्सप्रेस बंद होणार!

मुंबई | आयआरसीटीसीची प्रायव्हेट तेजस एक्सप्रेस बंद होणार आहे. येत्या २४ तारखेपासून मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या सर्व फेऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे पत्र आयआरसीटीसीने लिहिले आहे. केवळ मुंबई – अहमदाबाद नाही तर दिल्ली लखनऊ मार्गावर धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस देखील २३ तारखेपासून बंद करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. या दोन्ही एक्स्प्रेस’ला प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते आहे. त्यामुळे भारतातील खाजगी ट्रेनचे भवितव्य धोक्यात आले आहे.

जानेवारी महिन्यात मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर खाजगी तेजस एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली लखनऊ या मार्गावर पहिली खाजगी एक्सप्रेस चालवण्यात आली होती. वधुनी एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद आहे असे सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतर covid-19 मुळे लॉकडाऊन झाले. तेव्हापासून दोन्ही एक्सप्रेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. 17 ऑक्टोबर पासून मुंबई – अहमदाबाद ही ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली होती, मात्र एका महिन्यातच प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने ट्रेन बंद करण्याची वेळ आयआरसीटीसीवर आली आहे. आता जरी ही ट्रेन बंद करण्यात येत असली तरी जर प्रवाशांची मागणी वाढली तर पुन्हा एकदा ही ट्रेन सुरू करण्यात येईल असेही आयआरसीटीसीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Related posts

दिल्लीत पुन्हा विद्यार्थी हत्याकांड

News Desk

रेल्वे प्रशासनाने कामगारांकडून पैसे घेऊ नये !

News Desk

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावास आदित्य ठाकरेंचा विरोध

News Desk