HW News Marathi
देश / विदेश

आगीत दहा जणांचा मृत्यू

वॉशिंगटन(वृत्तसंस्था): अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण वणवा पेटला आहे. यात दीड घरांचा जळून कोळसा झाला असून किमान १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग झपाट्याने आसपासच्या परिसरांमध्ये पसरत आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी नापा, सोनोमा आणि यूबा येथा एमरजेंसी लागू केली आहे. तसेच 20 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रविवारी रात्री सर्वप्रथम आग लागल्याची माहिती मिळाली. पाहता-पाहता ही आग चक्क रविहासी भागांमध्ये पोहोचली. प्रशासनाने सध्या लोकांचा जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रीत खेले आहे. यासोबतच आग विझवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.

फॉरेस्ट अ‍ॅन्ड सिक्यॉरिटी डिपार्टमेंटने लोकांना लवकरात लवकर आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत धोकादायक परिसरांमधून 20 हजार नागरिकांना सुखरूप स्थळी पोहोचवण्यात आले आहे. झपाट्याने पसरणारी ही आग आता सॅन फ्रान्सिस्को पर्यंत जाईल असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, ही आग ताशी ६५ किमीच्या वेगाने पसरत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शबरीमालामध्ये महिलांना ‘प्रवेश’च नाही

swarit

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

HW न्यूज नेटवर्कच्या दोन्ही महिला पत्रकारांना जामीन मंजूर

News Desk