HW News Marathi
देश / विदेश

काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेप, NIA च्या विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

मुंबई | टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकला एनआयएच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी यासिनला दोषी ठरविले होते. यासिनला वेगवेगळ्या कलमा अंतर्गत शिक्षा सुनावली आहे. यात कलम १२१ अ अंतर्गत १० वर्षाची शिक्षा, यूएपीए कलम १३ अंतर्गत ५ वर्षाची शिक्षा, यूएपीए कलम १७ अंतर्गत १० लाखांचा दंड, यूएपीए कमल १८ अंतर्गत १० वर्षाची शिक्षा, यूएपीए कलम २० अंतर्गत १० वर्षाची शिक्षा आणि यूएपीए कलम ३८, ३९ अंतर्गत ५ वर्षाची शिक्षा या कलमा अंतर्गत यासिनला एनआयएच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  

यासिनने देशाविरोधात कट रचला, आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होता, आयएसआयच्या मदतीने काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणे, दहशतवाद्यांचा अजेंडा पुढे नेला, यूएपीए आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारणे हे आरोप ठेवले आहेत. या प्रकरणी न्यायालयाने आज (२५ मे) दुपारी सुनावणीला सुरु असून या पार्श्वभूमीवर पटियाला हाऊस न्यायालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच यासिनच्या श्रीनगरच्या घराबाहेर देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून यासिनला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

यासिनला राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयाने यूएपीए कायद्यांतर्गत १९ मे रोजी टेरर फंडिंग प्रकरणी दोषी ठरविले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला आहे. यासिकला दोषी ठरविल्यानंतर पाकिस्तान चवताळला असून या प्रकरणात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी उडी घेतली आहे. शाहिद आफ्रिदी आणि अब्दुल बासित यांनी भारताविरोधात ट्वीट केले आहे. शाहिद आफ्रिदीने ट्वीटमध्ये म्हटले, “मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज बंद करण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहे. यासिन मलिकावरील खोट्या आरोपांमुळे काश्मीरचा स्वातंत्र्य लढा थांबणार नाही. यूएनने काश्मीरच्या नेत्यांवरील अन्यायकारक आणि बेकायदेशीर खटल्याची दखल घ्यावी.”

  

Related posts

काँग्रेसची पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात, मोदींची संतप्त टीका

News Desk

पाकिस्‍तान भारताच्या विमानांसाठी हवाई हद्द बंद करणार ?

News Desk

पुलवामामध्ये २ दहशतवादी ठार

News Desk