कानो – बोको हराम या दहशतवादी संघटनेने केलेल्याबॉम्बहल्ल्यात नायजेरियात २८ जणांचा मृत्यू, तर ८२ जण जखमी झाले आहेत. उत्तर-पूर्व नायजेरियातील एकानिर्वासित शिबिराच्या प्रवेशद्वारावर तीन महिलांनी हाआत्मघातकी बॉम्बस्फोट घडवला. मंदारी शहरातील मैदुगिरीजवळ ही घटना घडल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी बाबा कुरा यांनी दिली.
हल्ल्यातील जखमींना मैदुगिरीच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. बोको हरामने नायजेरियात आतापर्यत केलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यात सुमारे २०हजार नागरिक ठार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बोको हरामने मैदुगिरी येथील डालोरी गावावरही दहशतवादी हल्ला केला होता. त्यात लहान मुलांसह ८६ जण ठार झाले होते. अतिरेक्यांनी डालोरी गाव आणि जवळ असलेल्या२५ हजार शरणार्थींच्या दोन तळावर हल्ला केला होता. त्यावेळी गावातील घरांना आगी लावून लहान मुलांना जिवंत जाळले होते. तेव्हासुद्धा तीन आत्मघातकी महिला हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.