HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये गुरुवारी (३० ऑगस्ट) सकाळपासून चकमक सुरू आहे.

बांदीपोराच्या हाजिन परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारी देखील केला. यानंतर जवानही दहशतवाद्यांच्या गोळीबारीला प्रत्युत्तर दिले होते.

जम्मू-काश्मीमधील अनंतनाग येथे भारतील लष्कराने हिजबुल या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा ठार केले होते. यानंतर हिजबुल या संघटनेच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ४ पोलीस शहीद झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चारा घोटाळ्याचा कट रचल्याचा चालणार लालू यादव यांच्यावर खटला

News Desk

चेन्नई विमानतळात प्रवाशाच्या बॅगेत सापडला चक्क बिबट्याचा बछडा

News Desk

दहशतवादाचा मार्ग पत्‍करलेल्या मुलांना त्यांच्या आईने घरी परत बोलवावे !

News Desk