नवी दिल्ली | देशभरात आज (५ मे) रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असताना जम्मू-काश्मीरमध्ये मात्र धक्कादायक प्रकार घडला आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे एका घरात घुसत दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात त्या घरातील एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी परिसरात शोधमोहिम सुरु झाली आहे.
पुलवामा येथील ज्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्या घरात ईद साजरी होत होती. या घरात शिरत दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. नगिना असे मृत महिलेचे नाव आहे.
Jammu and Kashmir: Stones pelted at security forces near Jamia Masjid in Srinagar; and posters supporting terrorist Zakir Musa and UN designated terrorist Masood Azhar seen in the area. pic.twitter.com/qu7uea90YO
— ANI (@ANI) June 5, 2019
ईदच्या निमित्ताने जगभरात आज उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, काश्मीरमध्ये ईदनिमित्त निघालेल्या रॅलीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ईदनिमित्ताने सकाळच्या नमाज पठणानंतर आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत काश्मीरमधील तरुणांनी चक्क जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि इसिस या दहशतवादी संघटनांचे झेंडे फडकवले आहेत. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान आणि त्या तरुणांमध्ये बाचाबाची देखील झाली. त्यामुळे, परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.