HW News Marathi
देश / विदेश

जम्मू विमानतळावर स्फोट, बॉम्बशोध पथक दाखल

जम्मू – काश्मीर | जम्मूमधील विमानतळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. आज (२७ जून) सकाळी तांत्रिक विभागात हा स्फोट झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या स्फोटाची माहिती मिळताच पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

भारतीय हवाई दलाकडून चालवल्या जाणाऱ्या सतवारी हवाई दल स्टेशनवर हा स्फोट झाला आहे. साधारण पहाटे २ वाजता हा स्फोट झाला आहे. मात्र हा स्फोट किती मोठा होता याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस सध्या हवाई दलाकडून प्राथमिक माहिती मिळण्याची वाट पाहत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Goa Elections : मोठी बातमी! उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार

Aprna

आता महाराष्ट्रासह भगतसिंह कोश्यारींकडे आणखी एका राज्याची जबाबदारी 

News Desk

“चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंत का?”, शेतकरी आंदोलनावर प्रकाश जावडेकरांची प्रतिक्रिया 

News Desk