HW News Marathi
देश / विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटर अकाऊंटवर ब्लॉक केल्याप्रकरणी सात जणांनी न्यायालयात तक्रार

न्यूयॉर्क | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही ट्विवटर युजर्सला ब्लॉक करु नये, असे आदेश अमेरिकेतील एका कोर्टाने दिलेत. न्यूयॉर्कच्या सदर्न जिल्हा न्यायालयात ट्रम्प यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ब्लॉक केल्याप्रकरणी सात जणांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. ट्विटरवर ब्लॉक करणे हे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचे न्यायाधीशांनी यावेळी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्षांनी अधिकृत ट्विट अकांऊटवर नागरिकांना ब्लॉक करणे अयोग्य आहे. हा प्रकार नागरिकांच्या राजकीय विचारावर निर्बंध लावण्याचा प्रकार असून राष्ट्राध्यक्षांनी कोणत्याही अमेरिकन नागरिकासोबत असे वर्तन करु नये, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रिक्समध्येही ‘सबका साथ, सबका विकास’

News Desk

इंधनाची टाकी धावपट्टीवर कोसळल्याने आग, गोवा विमानतळ दोन तासांसाठी बंद

News Desk

सरकार चालवता येत नसेल तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा !

News Desk