नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोटीस पाठवली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांनाही ८ जून रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे सांगितले आहे. सोनिया गांधी या ईडीच्या चौकशीसाठी स्वत: उपस्थिती राहणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी आज (१ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे. गेल्या ७ वर्षापासून न्यायलयात असलेल्या प्रकरणात आता ईडी प्रवेश केला आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरण हा एका कटाचा भाग असून सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटीस पाठवले आहे. पण, काँग्रेस घाबरणार नाही आणि कोणासमोर वाकणार पण नाही. आम्ही छाती ठोकून लढणार, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ईडीच्या नोटीसनंतर पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Enforcement Directorate summons Congress interim president Sonia Gandhi and party MP Rahul Gandhi over the National Herald case, which was closed by the investigating agency in 2015: Official Sources pic.twitter.com/RKqVNpEDXE
— ANI (@ANI) June 1, 2022
नेमके काय आहे प्रकरण
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र पंडित सुरू केले होते. एकेकाळी हे काँग्रेसचे मुखपत्र मानले जात होते. परंतु, काही काळातनंतर ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र बंद पडले. यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी २०१२ मध्ये ‘यंग इंडिया’ या वर्तमानपत्राचे हक्क विकत घेतले. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून काँग्रेस जवळपासू १६०० कोटींची संपत्तीही कमी किंमतीत घेतल्याचा आरोप भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला गेला होता. या प्रकरणी २०१५ मध्ये ईडीने तपास केला होता. हे संपूर्ण प्रकरण गेल्या ७ वर्षापासून न्यायालयात आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.