HW News Marathi
देश / विदेश

निवडणूक सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली |  निवडणूक सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. यानुसार आपले मतदान कार्ड आता आधार कार्डसोबत लिंग केले जाणार आहे. लोकसभेत आज (२० डिसेंबर)  केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले. या विधेयकामुळे सरकारने आधार आणि मतदार ओळखपत्र लिंग केल्याने बोगस मतदाराला आळा बसणार असल्याचे म्हटले जाते. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभा उद्या (२१ डिसेंबर) स्थगित करण्या आली आहे. मतदार यादीशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही, तर हे ऐच्छिक असल्याचे रिजिजू यांनी संसदेत सांगितले. 

या विधेयकाला गेल्या आठवड्यात बुधवारी (१५ डिसेंबर) केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी दिली होती. यानंतर हे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले असून विधेयकाला मंजुरी देखील मिळाली आहे. या विधेयकानुसार,  १९५० आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ मध्ये बदल करण्यात येणार आहे. लोकसभेत विधेयक मांडताना काँग्रेस, टीएमसी, एमआयएम, आरएसपी आणि बीएसपी या पक्षांनी विरोध दर्शविला. हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे विचारार्थ हे विधेयक पाठवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. 

https://twitter.com/ANI/status/1472865601269862400?s=२०

रिजिजू यांनी लोकसभेत विधेयक सादर करताना विरोधकांनी विरोध दर्शविला. या विधेयकामुळे देशातील नागरिकांच्या गोपनीयतेचे उल्लंघ होणार असल्याचे विरोधकांनी म्हटले. यावेळी विरोधकांनी लखीमपूर घटनेवरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची कॅबिनेटमधून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगात महारोगराई पसरल्याचे WHO ने केले घोषित

swarit

सलमान खानचे ‘चित्रपट’ आणि ‘टीव्ही शो’ भविष्य अंधारात

News Desk

सरकारी कर्मचारी कार्यालयात हेल्मेट घालून करतात काम

News Desk