नवी दिल्ली | हिममानवाच्या अनेक दंत कथा आपण ऐकल्या आहेत. महाकाय हिममानवाचे वर्णन तुम्ही अनेकदा पुस्तकात वाचलंदेखील असेल. हिममानवाच्या अस्तित्वाला दुजोरा मिळाला आहे. भारतीय लष्कराला मकालू बेस कॅम्पजवळ पायांचे काही ठसे आढळून आले आहेत. भारतीय लष्कराने पहिल्यांदाच हिममानव ‘येती’च्या अस्तित्वाचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. भारतीय लष्कराच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये महाकाय पायांचे ठसे दिसत आहेत. हे ठसे हिममानव ‘येती’च्या पायांचे असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.
For the first time, an #IndianArmy Moutaineering Expedition Team has sited Mysterious Footprints of mythical beast 'Yeti' measuring 32×15 inches close to Makalu Base Camp on 09 April 2019. This elusive snowman has only been sighted at Makalu-Barun National Park in the past. pic.twitter.com/AMD4MYIgV7
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) April 29, 2019
नेपाळ-चीन सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ लष्कराला कुठल्याच प्राण्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. या आकाराचा प्राणी अस्तित्वात नसल्यामुळे भारतीय सैन्य विचारत पडले आहे. मकालू-बारुन नॅशनल पार्कच्या याच परिसरात पूर्वीही हिममानवाचे ओझरते दर्शन घडल्याचा दावा देखील करण्यात आला होते.
‘यती’चे वर्णन दोन पायांवर चालणारा अवाढव्य वानर अशा स्वरुपात केले जाते. तो मानवाचा पूर्वज मानला जातो. १८३२ साली पहिल्यांदा एका गिर्यारोहकाने उत्तर नेपाळमध्ये दोन पायांवर चालणारे महाकाय वानर पाहिल्याचा दावा केला होता. त्यामुळे दंत कथांमधून आढळणारा हिममानवाची दखल आता गांभीर्याने घेतला जाणार असल्याची चिन्हे दिसून आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.