HW News Marathi
देश / विदेश

भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला

नवी दिल्ली | पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तानच्या सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. अजय बिसारिया हे पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त आहेत. या प्रकरणानंतर भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अजय बिसारिया हे आपल्या पत्नीसह रावळपिंडीनजीक असलेल्या हसन अब्दल येथील पंजा साहिब गुरुद्वारा येथे जात होते त्यावेळी त्यांना अडविण्यात आले. गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या देखील त्यांनी घेतल्या होत्या. तरीही त्यांना या ठिकाणी ऐनवेळी प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे इस्लामाबादला माघारी फिरावे लागले.

सदर प्रकरणानंतर पाकिस्तानच्या या कृत्याचा भारताकडून निषेध व्यक्त केला जात आहे. भारताने हा मुद्दा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडे उपस्थित केला असल्याने या कृतीच्या माध्यमातून पाकिस्तानचा उद्दामपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मागच्या दोन महिन्यातील अजय बिसारिया यांना गुरद्वारामध्ये प्रवेश नाकारल्याची ही दुसरी घटना आहे. अजय बिसारिया गुरुद्वारामध्ये शिख भाविकांची भेट घेण्यासाठी जात असल्याची माहीती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिराकिंग निघाला घोटाळेबाज

News Desk

अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकलेल्या ७ भारतीय जवानांचा मृत्यू

Aprna

धनंजय मुंडेंच्या जागी विधानपरिषदेवर शरद पवारांचा हा माणुस..

Arati More
राजकारण

मित्रपक्षावर अवलंबून न राहता स्वबळावर उमेदवार निवडून आणणारा !

News Desk

मुंबई | ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनद्वारे दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवून त्यात पराभव झाल्याने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मीयांचा व्यापक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. त्याकाळातील सत्ताधारी काँग्रेस चा पर्याय म्हणून प्रबळ व्यपक विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे व्यापक रिपाइं चे स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी सर्व आंबेडकरी समाज; सर्व रिपाइं गटांच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून सर्व जाती धर्मियांचा व्यापक रिपब्लिकन पक्ष उभारणार आहोत.केवळ दलित वस्तीमध्ये रिपाइंला मर्यादित ठेवू नका तर सर्व गावाची रिपाइं शाखा स्थापन केली पाहिजे तरच मित्रपक्षावर अवलंबून ल राहता स्वबळावर उमेदवार निवडून आणणारा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची ओळख आपण बनवू शकू असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठाणे ढोकाळी येथील हायलँड मैदानात रिपाइं चा दि 3 ऑक्टोबर रोजी 61 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ना आठवले बोलत होते.यावेळी ठाणे शहर अध्यक्ष रामभाऊ तायडे ; दयाळ बहादूरे; साहेबराव सुरवाडे;मनीषा करलाद ; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाच्या 61 व्या वर्धापन दिनाचा सोहळा ठाण्यात हायलँड मैदानावर अयोजित केला असून या सोहळ्यास राज्यभरातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले उपस्थित राहणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस ;ठाण्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे; खासदार कपिल पाटील; राज्यमंत्री रवींद्र चव्हाण ; खासदार राजन विचारे; आमदार निरंजन डावखरे; प्रताप सरनाईक ;प्रताप सरनाईक आदी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी ठाणे शहर अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी दिली.

रिपब्लिकन पक्षाने काँग्रेस सोबत त्यानंतर राष्ट्रवादी; नंतर रिडलोस आणि आता शिवशक्ती भीमशक्ती युतीचा प्रयत्न करून शिवसेना भाजप शी युती केली . रिपाइं चा प्रदीर्घ काळ हा युती च्या राजकारणात गेला. युती केल्याने मित्र पक्षांना रिपाइंचे मतदान मिळत गेले मात्र मित्रपक्षांची मते रिपाइं ला मिळाली नसल्याची खंत ना रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे मित्रपक्षावर अवलंबून न राहता स्वबळावर प्रत्येक जिल्ह्यात एक तरी आमदार आपण स्वबळावर निवडून आणला पाहिजे असा प्रबळ रिपब्लिकन पक्ष साकारण्याचा कार्यकर्त्यानी निर्धार करावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

देशात कुठे अतिवृष्टीने पूर येतो तर कुठे दुष्काळ असतो यावर उपाय म्हणून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नदी जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली. मात्र काँग्रेस ने देशावर 60 वर्ष राज्य केले तरी कधीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारले नाहीत असा आरोप ना रामदास आठवलेंनी काँग्रेसवर केला. काँग्रेस च्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा एकच पक्ष उभारावा असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. त्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. मात्र अद्याप तसा व्यापक रिपाइं अजून आम्ही साकारू शकलो नाही. सन 1978 मध्ये सर्व विरोधी पक्षांचा एकच पक्ष म्हणून जनता पार्टी चा प्रयोग झाला होता. असे रामदास आठवले म्हणाले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष साकारण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य व्हावे यासाठी आपण 1990 मध्ये आपले भारतीय दलित पँथर सारखे संघटन बरखास्त केले होते.त्यानंतर रिपाइं स्थापन करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष साकारण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. सन 2007 पासून केवळ आपल्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष रिपाइं चा वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात साजरा करीत असतो असे सांगत यंदाही 3 ऑक्टोबर ला रिपाइं चा 61 वा वर्धापन दिन मोठया उत्साहात आणि लाखो रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या उपस्थित साजरा होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला .

Related posts

पंतप्रधान मोदींच्या पक्षाची एक्सपायरी डेट लवकरच संपणार !

News Desk

“भारत जोडो यात्रेत ‘मविआ’च्या काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

Aprna

वर्षा गायकवाड यांचा पूरग्रस्त भागात दौरा, कार्यकर्त्यांनी वाजवले फटाके

News Desk