तामिळनाडू | द्राविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या चेन्नईमधील पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना चेन्नई येथे घडली आहे. या पुतळ्याच्या डोक्यावर अज्ञातांनी चप्पल ठेवल्याचे आढळून आले आहे. तसेच सदर पुतळ्याची विटंबना केल्याचे समोर आले आहे. याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकसी सुरु केली आहे. ही घटना चेन्नईमदील तिरप्पूरमध्ये घडली.
Tamil Nadu: A statue of Periyar was found to be vandalised by unidentified miscreants today morning, with a pair of slippers kept on the top of it in Chennai's Tiruppur. Police have started an investigation. pic.twitter.com/qhZhRC12Ml
— ANI (@ANI) September 17, 2018
इरोडे वेंकटप्पा रामास्वामी असे त्यांचे नाव असून ते पेरियार या नावाने ओळखले जात. त्यांनी काँग्रेसमधून फारकत घेत ब्राम्हणविरोधी चळवळ उभी केली होती. या चळवळीला द्रविडर कझागम असे ओळखले जाते. यानंतर अन्नादुराई यांनी डीएमके पक्षाची स्थापना केली. यापूर्वीही मार्चमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याचे मुंडके उडविण्यात आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.